
बातमी कट्टा:- मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील बाबळे फाटा जवळ अज्ञात अवजड वाहनाने मोटरसायकल मागून धडक दिल्याने अपघात झाला .या अपघातात एका 42 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू तर दुसरा तरुण जखमी झाला आहे.चेतनकुमार शिवाजी पाटील रा.पित्रेश्वर शिरपूर असे मयत तरुणाचे नाव आहे.घटनास्थळा वरून माजी खासदार डॉ सुभाष भामरे जात असताना त्यांनी जखमींची विचारपूस करीत तपासणी केली.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर येथील चेतनकुमार शिवाजी पाटील व मनोहर माळी दोघेही जण मार्केटिंग म्हणून कार्यरत आहेत.आज दि १३ रोजी ५ वाजेच्या सुमारास चेतनकुमार पाटील व मनोहर पाटील दोघेही जण काम आटोपून मोटरसायकलीने शिरपूरकडे येत असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील बाभळे फाटा येथे अज्ञात भरधाव वाहनाने मोटरसायकलीला मागून जोरदार धडक दिली या अपघाता दरम्यान माजी खासदार डॉ सुभाष भामरे धुळ्याकडे जात असतांनाच त्यांना अपघाताची घटना दिसल्याने डॉ सुभाष भामरे यांनी तात्काळ दोघांची तपासणी केली.

यावेळी चेतनकुमार शिवाजी पाटील यांना डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर मनोहर माळी गंभीर जखमी झाले.मयत चेतनकुमार पाटील यांचे लहान भावाचा देखील सहा महिन्यांपूर्वी अपघाता निधन झाल्याने घरातील संपूर्ण जबाबदारी चेतनकुमार पाटील यांच्यावर होती.चेतनकुमार पाटील यांच्या पश्चात पत्नी,मुलगी ,आई, वडील असा परिवार होत
