
बातमी कट्टा:- काम आटोपून घरी जात असतांना दोन मोटरसायकलींमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.धडकेनंतर दोन्ही मोटरसायकलींनी आगीचा भडका घेतला होता.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर बोराडी रस्त्यावर नांदर्डे शिवारात दोन मोटरसायकलींमध्ये भीषण अपघात झाला.हा अपघात ईतका भीषण होता की यात दोन्ही मोटरसायकलींनी आगीचा भडका घूतला यात मोटरसायकली चक्काचूर झाले आहेत.शिरपूर तालुक्यातील वाकपाडा येथील कैलास महादू पावरा वय 27 हा शिरपूर येथे कॉल्ड स्टोरेज मध्ये कामाला होता.

दि 28 रोजी रात्री काम आटोपून कैलास मोटरसायकलीने वाकपाडा येथे आपल्या घरी जात असतांना बोराडी येथील राकेश शांतीलाल सैंदाणे (बोराडी) वय 23 हा तरुण मोटरसायकलीने बोराडीकडून शिरपूर कडे येत असतांना रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास दोन्ही मोटरसायकलींमध्ये समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात कैलास पावरा याचा जागिच मृत्यू झाला तर राकेश सैंदाणे याला जखमी अवस्थेत शिरपूर येथील इंदिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यावेळी राकेश सैंदाणे याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.