
बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर भीषण अपघात झाला असून या अपघातात धुळ्याचे नगरसेवकांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि 18 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.नाशिकहून धुळ्याकडे येणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे येथील नगरसेवक किरण हरिश्चंद्र अहिरराव रा. महिंदळे, मोघण माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक कृष्णकांत चिंधा उर्फ बाबा माळी रा मोघण ता. धुळे,अनिल विष्णू पवार व प्रवीण मधुकर पाटील रा.अवधान हे चारही जण रात्री एमएच १५ डीएस १५०० या स्विफ्ट डिझायर कारने मुंबई येथून आज पहाटेच धुळ्याकडे येत होते.नाशिकच्या पुढे आल्यानंतर मलसाने गावाजवळून जात असताना णमोकार तिर्थाजवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेला कंटेनरला त्यांच्या स्विफ्ट कारने मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट डिझायर वाहनाचा अक्षरशः चक्काचूर होवून वाहनात बसलेले नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू झाला.नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह अपघातात ठार झालेले सर्वजण जिवलग मित्र होते.