भीषण अपघातात पाच जण ठार, धुळे जिल्ह्यातील चार तर जळगाव येथील एकाचा मृत्यू !

बातमी कट्टा:- दुधाचे टँकर बंड पडल्याने क्रेनच्या मदतीने दुसऱ्या टँकर मध्ये दुध टाकत असतांना भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे.पहाटेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात एकुण पाच जण ठार झाले असून यात चार जण धुळे जिल्ह्यातील तर एक जळगाव येथील असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळ धुळे येथून दुध घेऊन जाणारे टँकर बंद पडल्याने त्या टँकर मधील दुध दुसऱ्या टँकरमध्ये टाकण्याचे काम सुरु होते. यासाठी क्रेन देखील बोलविण्यात आली होती.घटनास्थळी काम सुरु असतांना समोरून भरधाव टाईल्स घेऊन येणाऱ्या अवजड ट्रकने जोरदार धडक दिली.

भीषण अपघाताची माहिती प्राप्त होताच घोडसगाव येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना बाहेर काढत मुक्ताईनगर रुग्णालयात दाखल केले.या अपघातात
पवन सुदाम चौधरी गल्ली 7 रा.धुळे, धनराज बन्सीलाल पाटील रा.नगाव ता.धुळे,धनराज सुरेश सोनार जळगाव, उमेश राजेंद्र सोलंके रा.देवपुर धुळे व भालचंद्र गुलाब पाटील रा.बिलाडी धुळे या पाच ही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.अपघाता नंतर फरार झालेल्या ट्रक चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: