भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

बातमी कट्टा:- सासरवाडी येथून कुटुंबासोबत मोटरसायकलीने आपल्या गावी जात असतांना अचानक बंद लाईट असलेल्या भरधाव ॲपेरिक्षाने मोटरसायकलीला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर पत्नी व मुलगा जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार काल दि 20 रोजी रात्रीच्या सुमारास नवापुर तालुक्यातील रायंगण गावालगत बुधवारी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान ॲपेरिक्षा व मोटरसायकलीचा भीषण अपघात झाला.या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग वरील रायंगण पुलाच्या वळणावर हॉटेल सुजित समोर पोलीस कर्मचारी यांच्या मोटारसायकलीला समोरून येणाऱ्या लाईट बंद असलेल्या ॲपेरिक्षाने जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील पती-पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले.या अपघातात दुचाकीस्वार पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.पोलीस कर्मचारी दिनकर पाडवी आपल्या परिवारासह नवापुर शहरातील तीनटेंबा येथील आपल्या सासरवाडीत कामासाठी आले होते. काल संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास नवापूरहून आपल्या गावी वावडी येथे मोटारसायकलीने निघाले असता.ॲपेरिक्षा व मोटरसायकलीचा भीषण अपघात झाला.या अपघातात पोलीस कर्मचारी दिनकर पाडवी यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर त्यांची पत्नी ज्योती दिनकर पाडवी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दीड वर्षाच्या मुलगा जयेश पाडवीला किरकोळ दुखापत झाली आहे.

दिनकर पाडवी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी होते. त्यांचा अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.आज त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: