भीषण अपघातानंतर धुळे जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल, काय म्हणालेत धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा ? बघा व्हिडीओ

बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात खडी घेऊन जाणाऱ्या ट्रालाचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील पळासनेर गावाजवळ भीषण अपघात घडला आहे.या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 ते 25 जण जखमी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. खडी वाहतूक करणाऱ्या ट्रालाचे ब्रेक फेल झाल्याने ट्राला थेट समोरील मोटरसायकली,कारसह हॉटेल मध्ये जाऊन धडकला. घटनेनंतर धुळे जिल्हाधिकारी व शिरपूरचे आमदार यांनी घटनास्थळी भेट दिली असून जखमींची चौकशी करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 10:30 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्याकडे खडी घेऊन जाणाऱ्या ट्रालाचा अचानक ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला.यात ट्रालाने शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या मोटरसायकल,कारला धडक देत थेट ट्राला हॉटेलला जाऊन धडकून पलटला.यात ट्राला पलटी झाल्याने खडीच्या ढिगाऱ्याखाली देखील काही जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली भीषण अपघातात 9 जण दगावल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून काही जण जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु करण्यात आले घटनास्थळी महामार्ग पोलीस देखील दाखल झाले असून मदतकार्य सुरु करण्यात आले.मृत व जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांना गर्दी झाली होती.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि आमदार काशिराम पावरा दाखल होत घटनेची माहिती जाणून घेतली होती.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: