बातमी कट्टा:- भल्या पहाटे इलेक्ट्रॉनिक दुकानासह गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली.या आगीने रौद्ररूप धारण केले होते.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले.यात सुमारे 40 ते 50 लाख किंमतीचा इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक झाले आहे.यावेळी आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमनचा एक कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळासमोरील विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.या आगीने रौद्ररूप धारण केले होते.नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.आग जास्त असल्याने इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाले तसेच जवळील गोडाऊन मधील साहित्य देखील जळून खाक झाले.नवापुर नगरपालिकेचे अग्निशामक बंबाच्या तीन गाडी, सोनगड नगर परिषद अग्निशामक,नंदुरबार नगर परिषद अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. यादरम्यान एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

या भिषण आगीमध्ये दुकान आणि गोडाऊन मधील 30-40 फ्रिज,10 एसी, 30 एलईडी टि व्ही, 250 फॅन,10 वॉशिंग मशीन, 40 साधी टि व्ही, 50 आर्यन,इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकुन 40 ते 50 लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.
