भीषण घटना,अपघातानंतर टँकरचा स्फोट,चालकचा होरपळून मृत्यू

बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर केमिकलयुक्त पदार्थ वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात होऊन भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यात संपूर्ण टँकरने पेट घेतला टँकर जळून खाक झाला असून यात टँकर चालक अडकल्याने आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर गावाजवळ आज दि 1 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश कडून शिरपूरच्या दिशेने भरधाव टँकरने ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडके नंतर टँकर पलटी होऊन टँकरचा स्फोट झाला यावेळी टँकरने आगीचे रौद्ररूप धारण केले. आगीत संपूर्ण टँकर जळून खाक झाले आहे.प्राथमिक माहिती नुसार या टँकरमधील चालक टँकरमध्ये अडकला असून या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सदर टँकर मध्ये केमिकलयुक्त पदार्थ असल्या कारणाने टँकरचा स्फोट झाला या स्फोटाचा मोठमोठ्याने आवाज आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.या आगीने रौद्ररूप धारण केले असून यात संपूर्ण टँकर जळून खाक झाले आहे.गेल्या एक तासापासून आग सुरुच आहे.घटनास्थळी नागरिकांसह पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: