
बातमी कट्टा:-माझी लाडकी बहिण योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळावा यासाठी भुपेशभाई पटेल सकाळपासूनच रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले.मात्र यादरम्यान त्यांच्या एका ह्रदयस्पर्शी कामामुळे सर्वसामान्य जनतेविषयी त्यांची असलेली तळमळ आज अनुभवायला मिळाली.

आज दि २० रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास भुपेशभाई पटेल आपल्या काही कार्यकर्त्यांसह रामसिंग नगर भागात माझी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी पायी निघाले.रामसिंग नगर मध्ये प्रत्येक घरातील महिलांना माझी लाडकी योजनेचा अर्ज भरण्यासाठी भुपेशभाई पटेल विनंती करत होते.काहींकडे घरात काम करणाऱ्या किंवा मजूर महिला असतील त्यांचा देखील अर्ज आताच भरून घ्या अशी पोटतिडकीने भुपेशभाई पटेल प्रत्येक घरातील सदस्यांना सांगत होते.

हे सांगत चालत असतांना रामसिंग नगर भागातील एका झोपडी जवळ असलेल्या वृध्द महिलेला काय माय लाडकी बहिणना फॉर्म भरा का ?असे अहिराणी बोलीभाषेत प्रश्न विचारला.यावेळी त्या आजीबाई देखील न ई बा म्हणत नकार दिला. मात्र यावेळी भुपेशभाई पटेलांची नजर त्या आजीच्या पायाला दुखापत झालेल्या ठिकाणी गेली.आणि पायले काय लागेल शे म्हणत भुपेशभाईंनी आजीच्या प्रकृतीची विचारणा केली.

यावेळी तेथील उपस्थित कार्यकर्त्याने सांगितले की आजी एकटी राहते आणि परिस्थिती हालाखीची असून आजीबाईच्या पायाला दुखापत झाली आहे आणि त्यात त्यांना डायबिटीस आहे.हे ऐकल्यावर भुपेशभाई पटेल त्या कार्यकर्त्याला पुढे घेऊन गेले.आणि उपचारासाठी खिशातून पैसे काढून त्या आजीला द्यायला लावले आणि वाहनात बसवून इंदिरा मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचार करण्यासाठी पाठवण्याचे कार्यकर्त्याला सांगितले आणि पुढे पुन्हा प्रत्येक घरातील सदस्यांना अर्ज भरण्याबाबत सांगत तेथून निघून गेले.

अत्यंत हलाखीची परिस्थिती त्यात पायाला असलेल्या दुखापतीच्या विवंचनेत त्रस्त झालेल्या या आजीबाईला अचानक मिळालेल्या मदतीमुळे आजीच्या चेहर्यावर समाधान बघायला मिळाले.दुखाचा डोंगर डोक्यावर घेऊन जगणाऱ्या आजीबाईला भुपेशभाईंनी केलेल्या मदतीनेमुळे उपस्थितांनी भुपेशभाई पटेलांचे तोंडभरून कौतुक केले.
