बातमी कट्टा:- बिजासन मंदिराजवळ कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याला ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आवाजाने जंगलात पळवून लावला.या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून पाहणी करून रात्रीची गस्त वाढविण्यात आली असुन.बिबट्याला लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिरपुर तालुक्यातील महाराष्ट्र -मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या बडी बिजासन मातेच्या मंदिराजवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास कुत्र्याच्या शिकार करण्यासाठी बिबट्या आला होता.कुत्र्याच्या भूकंण्याचा आवाज आल्याने.कुत्रे का ? भूकत आहेत हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मंदिराच्या पाठीमागे आले असता बिबट्या लपून बसल्याचे दिसुन आला.ग्रामस्थांनी गर्दी करुन फटाके फोडले फटाक्यांच्या आवाजाने काही वेळानंतर बिबट्या जंगलाचा दिशेने पळून गेला.या घटनेने परीसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटणास्थळाची पाहणी करून ग्रामस्थांची विचापुस करून रात्रीची गस्त वाढण्यात आली आहे.बिबट्याला जवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.