बातमी कट्टा:- गळ्यातील मंगळपोत हिसकावून पसार झालेल्या संशयिताला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत 20 हजार किंमतीचे मंगळसूत्र ताब्यात घेतले आहे. याबाबत मंळपोत चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दि 24 रोजी 7:30 वाजता शिरपूर शहरातील चोपडा जिन समोर असलेल्या ट्रॅव्हल्स पॉइंट येथील स्वामी ट्रॅव्हल्स जवळ महिलेच्या गळ्यातील सोनपोत जबरीने ओढून चोरी झाली होती याबाबत फिर्यादी यांनी चोरी करणाऱ्या संशयिताचे वर्णन पोलिसांना सांगितले होते.पोलिसांनी वर्णनानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने शोध घेतला असता सोनु उर्फ सोन्या दगा बुवा वय 24 रा. वघाडी ता.शिरपूर यास शिताफीने पकडून त्याचे अंगझडतीत एकुण 20 हजार रुपये किंमतीचे अंदाजे 6 ग्रँम वजनाची सोन्याचे मणी असलेले मंगलपोत हस्तगत करत फिर्यादी यांच्याकडे सुपूर्द केले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख,पोहेकॉ ललित पाटील,लादुराम चौधरी,गोविंद कोळी,विनोद अखडमल,प्रविण गोसावी,मनोज दाभाडे,मुकेश पावरा,अनिल अहिरे,उमेश पवार,प्रशांत पवार आदींनी कारवाई केली आहे.