बातमी कट्टा:-मजुर वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाचा तोल गेल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाल्याची घटंआ आज सकाळच्या सुमारास घडली असून यात तीन जण गंभीर जखमी झाले तर काही मजूर किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बोराडी जवळील बोराडी घाटाच्या खाली नांदर्डे गावाजवळ शेतातील कामांसाठी मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. आज दि 7 रोजी सकाळच्या सुमारास मजुर वाहतूक करत असतांंना पिकअप वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी होत झाडाला जाऊन धडकली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सुरु केले शिरपूर येथुन देखील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होत जखमींना इंदिरा मेमोरिअल रुग्णालयात दाखव केले तर काही किरकोळ जखमींना बोराडी येथे पाठविण्यात आले.
या पिकअप वाहनात नवागाव ,उमर्दा, बुडकी परिसरातील मजूर होते.यात अनिता कालसिंग पावरा रा.पिंपरीपाडा कोडीद ,मंजु शुरमा पावरा रा.नवागाव,मंगला दोरसिंग पावरा रा.नवागाव यांच्या ईतर मजूर जखमी झाले आहेत.


