बातमी कट्टा:- मजूरांना घेऊन जाणारे वाहन ओसांडून वाहणाऱ्या नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना काल दि 22 रोजी घडली आहे. गाडीचा पाटा तुटल्याने गाडी पाण्यात पडली असून या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.तर 5 जण जखमी झाले आहेत.
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर जवळील माजरे गावाजवळील असलेल्या पश्चिम पट्ट्यातील वारसा फाटा जवळ मजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती वाहन नाल्यात पडल्याची घटना काल दि 22 रोजी घडली आहे.मजूर घेऊन जात असतांना वाहनाचा पाटा तुटल्याने वाहन थेट ओसंडून वाहणाऱ्या नाल्यात जाऊन पडला.
एकाच घरातील मजूर कुटुंब जात असतांना हा अपघात घडला आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने पाण्यात बुडणाऱ्या मजुरांचे प्राण वाचविण्यात आले यात एकाचा मृत्यू झाला आहे.तर 5 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
बघा व्हिडीओ