बातमी कट्टा:- धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काँग्रेस पक्षाने वर्चस्व सिध्द केले आहे. आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली 18 पैकी 16 जागा जिंकत महाविकास आघाडीने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकवला आहे.
बघा काय म्हणालेत आमदार कुणाल पाटील ? व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/rY7lCKdgzGY
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी चुरशीची लढाई बघायला मिळाली.यात भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.मात्र काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात विजय मिळवलेल्या काँग्रेस पक्षाने चाळीस वर्षाची सत्ता अबाधित ठेवली. भाजपाचे खासदार सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांनी संपूर्ण भाजप पॅनेलचा धुवा उडवला आहे.हा जनतेचा विजय असून भाजपची लोकशाही विरोधी भूमिका आणि महाविकास आघाडीने सत्ता काळात केलेली कामे यामुळेच
कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीला कौल मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी दिली.
बघा काय म्हणालेत आमदार कुणाल पाटील ? व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा