बातमी कट्टा:- राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आज शेताच्या बांधावर येऊन परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांना ठोस मदतीचे आश्वासन देतील अस वाटत असतांना मात्र कुठलेही ठोस मदतीचे आश्वासन न देता कृषी मंत्री यांनी पाहणी करुन नंदुरबारकडे जाण्यासाठी मार्गक्रमण केले यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पुर्णता पाणी फिरले आहे.

आज दि 10 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे शिंदखेडा तालुक्यातील सोंडले येथे आले होते.येथील शेतातील पिकांची त्यांनी पाहणी केली.गेल्या 40 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील काही भाग आणि खानदेशामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.या दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी दादा भुसे यांनी आज सकाळी केली.
यावेळी मात्र शेतकऱ्यांना राज्यशासनाकडून असलेली मदतीची अपेक्षा होती मात्र कृषी मंत्री दादा भुसे यांनी यावेळी कुठलेही ठोस मदतीचे आश्वासन दिले नाही.शेतातील पिकांची वरवर पाहणी करुन,याबाबत आढावा घेण्यात येईल,बैठका बोलविण्यात येईल,विचार केला जाईल यापलीकडे कुठलेही ठोस आश्वासन मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी केली अपेक्षा भंग झाली असे यावरून दिसून येते.
कृषी मंत्री दादा भुसे यांचा हा दौरा शेतकऱ्यांच्या जखमांवर मिठ टाकणारा होता की काय ? असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांना पडला.मोफत बि-बियाणांची देखील साधी घोषणा मंत्री दादा भुसे यांना करता आली नाही.परिस्थिती बिकट असल्याचे मान्य केले मात्र मदत काय दिले जाईल ? यावर बोलणे त्यांनी यावेळी टाळले.उआज नंदुरबार जिल्ह्यात देखील दादा भुसे यांचा दौरा आहे.