बातमी कट्टा :- शेतातील रोजंदारीचे काम करुन पिता पुत्र घरी येत असतांना मधमाश्यांनी अचानक हल्ला केला.या हल्ल्यात मधमाश्यांनी संपूर्ण शरीरावर डंक मारल्याने वडीलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सय्यद सफदर सय्यद इस्माईल वय ५८ व त्यांचा मुलगा सय्यद अबिद हे दोन्ही जण शेतातील रोजंदारीचे काम आटोपून परत येत असतांना सिंदोळ रस्त्यावर अचानक वडाच्या झाडावर असलेल्या मोहोळाच्या मधमाश्यांनी बाप लेकांवर हल्ला केला.
मधमाशांनी संपूर्ण शरीरावर हल्ला केल्यामुळे वडीलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा सय्यद अबिद यास गंभीर जखमी झाल्याने जळगाव येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच तरुणांसह नागरिकांनी मदतीसाठी धावाधाव केली.मयत सफदर यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले तीन मुली असा परिवार होत.