
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/AsZrTETJ6A0?si=aZaX1D3aClK1j68U
बातमी कट्टा:- शिरपूर कडून चोपड्याच्या दिशेने जाणाऱ्या मध्यप्रदेश परिवहन बसचा आणि इको वाहनाचा आज दि 1 रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात इको या चारचाकी वाहनाची एक बाजू अक्षरशः चक्काचूर झाली आहे तर बस रस्त्याच्या बाजूला खाली कोसळली.
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/AsZrTETJ6A0?si=aZaX1D3aClK1j68U
इंदौर बर्हाणपूर या मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसचा शिरपूर कडून चोपडाच्या दिशेने जातांना अपघात झाला.अजनाड बंगला गावाजवळ चोपडाकडून शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या इको वाहनाला मध्यप्रदेश परिवहन बसने धडक दिली.आणि बस पुढे जाऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले.
जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जखमींमध्ये बळीराम लालुराम सरदार वय ६० मध्यप्रदेश, रेखाबाई समाधान अहिरे वय ४५ जळगाव,सिध्दार्थ फकीरा खैरणार वय 37 निंबोरला मध्यप्रदेश बस चालक,कुसूम भगवान मोरे वय ५१,जळगाव, भगवान सम्राट बावीस्कर वय ४७ जळगाव जयश्री योगेश पाटील वय २५ रा.अमळनेर हे जखमी झाले आहेत तर सचिन जैन या इको चालकाला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.या अपघात सुदैवाने जिवीतहानी टळली असून काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याची प्रचिती लोकांना अनुभवयास मिळाली.
व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा https://youtu.be/AsZrTETJ6A0?si=aZaX1D3aClK1j68U