बातमी कट्टा:- मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या आयशर वाहनावर चोरांनी दगडफेक व लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवत काचा फोडले मात्र आयशर मध्ये कुठलीही वस्तू त्यांना मिळून आली नाही.हा संपूर्ण घटनाक्रम सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये चित्रीत झाले आहे.चालकाच्या म्हणण्यानुसार त्या संशयितांकडे चाकु होता व सर्वच तोंड बांधून आले होते.
आज पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी समर्थ पेट्रोलपंप येथे इंदौर येथून बेळगाव जाणारी आयशर डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर आली मात्र त्यांनी रात्री डिझेल टाकण्यास नकार दिल्याने आयशर चालकाने आयशर तेथेच उभी करत आयशरच्या कँबीनमध्येच चालक व क्लिनर झोपले यावेळी त्या ठिकाणी चार ते पाच संशयित आले व त्यांनी आयशर वर हल्ला चढवला त्यांनी हातात असलेल्या साहित्यांनी आयशरच्या काचा फोडण्यास सुरुवात केली काही संशयित चालकच्या दिशेने दरवाजाच्या काचाफोडत होत काही जण क्लिनरच्या दिशेने काचा फोडण्यास सुरुवात केली.यावेळी आयशर मधील चालक व क्लिनरांनी कँबीन मधील स्टँमी त्यांना मारण्यासाठी काढली तेव्हा ते संशयित आयशरच्या कँबीन पासून दुर पळाले व तेथून दगडफेक करत राहिले चालक व क्लिनर आयशर मधुन उतरुन पेट्रोलपंपच्या ऑफीसच्या दिशेने पळाले तेथे कोणीही दरवाजा उघड नसल्याने आयशर चालकाने हातातील स्टँमीने ऑफीसचे काचा फोडल्या आणि ऑफीस मध्ये आवाज दिला तेव्हा कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून चालक व क्लिनर दोघांना आत घेतले.पुन्हा थोड्यावेळाने संशयित आयशर जवळ आले व त्यांनी आयशरच्या कँबीन मध्ये प्रवेश करत चोरी सुरु केली मात्र कँबीन मध्ये एकही चोरी करण्यासारखी वस्तू न दिसल्याने ते तेथून रिकामे हाताने परत गेले.
या घटनेची माहिती थाळनेर पोलीसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे पथक दाखल होत चौकशी केली याबाबत सकाळी थाळनेर पोलीस स्टेशन येथे आयशर चालक व क्लिनर तक्रार देण्यासाठी गेले होते.हा संपूर्ण घटनाक्रम तेथील पेट्रोल पंपावरील सी.सी.टी फुटेज मध्ये चित्रीत झाला आहे.