बातमी कट्टा:- ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला रेल्वेमार्गाचा प्रश्न 2014 साली खासदार म्हणून निवडून आलो तेव्हाच रेल्वेमार्ग साकारणार असल्याचा निर्धार केला होता.मनमाड मालेगाव धुळे इंदौर रेल्वेमार्ग होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे प्रतिपादन खासदार सुभाष भामरे यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु,नितीन गडकरी विद्यमान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर बोरविहीर ते नरडाणा या रेल्वेमार्गाचे काम लवकल सुरू करण्यासाठी २५ गावांमध्ये भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे दिशाभूल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कोणीही गैरसमजला थारा देऊ नका मनमाड धुळे इंदौर रेल्वेमार्ग होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे आवाहन खासदार सुभाष भामरे पत्रकारपरिषदेत आहे.