बातमी कट्टा:- एकीकडे आमदार कुणाल पाटीलांनी कोरोनाबाबत जनजागृती करत नागरिकांनी काळजी घेत एकत्र लढा देण्याचे आवाहन केले आहे.तर दुसरीकडे मात्र शिरपूर तालुक्याचे चित्र काहीस वेगळे बघावयास मिळत आहे.धुळे जिल्ह्यात लसीकरणाच्या बाबतीत शिरपूर शहर पिछाडीवर आहे.अद्यापही शहरी भागात फक्त 55 टक्के लसीकरण झाले आहे.खुद्द जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शिरपूर शहर व तालुका लसीकरणात जिल्ह्यात मागे असल्याचे सांगून चिंता व्यक्त केली होती.आपल्या मतदारसंघाची कोणाला किती काळजी वाटत असावी हे यावरून स्पष्ट होत असून आहिराणी भाषेच्या म्हणी प्रमाणे “मना मामान्या शंभर गायी,सकाय उठी काही नही” अशी गत झाली आहे.
प्रत्येक क्षेत्रात राज्य, देशपातळीवर आघाडीवर दाखविण्यात येणारा शिरपूर तालुका कोविड 19 लसीकरणात मात्र पिछाडीवर गेल्याचे निराशाजनक चित्र आहे.एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शिरपूर तालुका व शहर लसीकरणात मागे असल्याचे सांगून चिंता व्यक्त केली होती. आम्ही किती स्मार्ट आहोत हे दाखविण्याचा नांदात शहरातील
डेंग्यू ,चिकनगुन्यासह साथीच्या आजारांमुळे शहरातील जनता त्रस्त असल्याची जाणीव कोणलाही होतांना दिसत नाही.शहर लसीकरणात मागे आहे तर त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याच्याशी कोणालाही घेनदेन नाही.
आता ओमीक्रॉनसह कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.या भयंकर आजारात आपल्या मतदार संघातील कोणीही अडकू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे येणे आवश्यक आहे.आमदार कुणाल पाटीलांनी त्यांच्या मतदार संघातील जनतेला कोरोना व ओमिक्रॉन पासून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.फक्त मतदार संघच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला आवाहन करत त्यांनी या बाबतचे महत्त्व पटवून दिले आहे. याबाबतच्या बातम्या देखील प्रकाशित करण्यात आले आहेत.मग आमदार कुणाल पाटील हे जनेतेला आवाहन करु शकतात तर मग शिरपूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी का पुढे सरसावतांना दिसत नाहीत बरं ?
आपला स्मार्ट तालुकातर लसीकरणात जिल्ह्यात सगळ्यात पिछाडीवर आहे त्यावर देखील कोणी बोलायला तयार नाही. आपणास जनतेची किती काळजी असावी हे यावरुन आता स्पष्ट होतांना दिसत आहे.लसीकरणाबाबत शहरात जनजागृती करणे गरजेचे होते.जेणे करुन जनता लसीकरणासाठी पुढे पाऊल टाकेल मात्र कोणाला काही घेन देन नाही.फक्त एखाद्या बाहेरच्या पुढारीला बोलवून शिरपूर स्मार्ट सिटीचा डंका वाजवून मोकळे होणे ऐवढच कार्य सध्या सुरु आहे.आमदार कुणाल पाटील आवाहन करत आहेत मग आपण कुठे आहात साहेब ? असा प्रश्न पडत आहे.आहिराणी भाषेच्या म्हणी प्रमाणे “मना मामान्या शंभर गायी,सकाय उठी काही नही” अशी गत झाली आहे.