
बातमी कट्टा:- सिक्कीम येथील दुर्घटनेत शहीद झालेले जवान मनोज माळी यांच्यावर साश्रू नयनांनी धुळे जिल्ह्यातील वाघाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
शहीद जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.यावेळी वाघाडी गावांमध्ये मनोज माळी यांचा फोटो ठेऊन व रांगोळी काढून जवान मनोज माळी यांना आदरांजली वाहण्यात आली.गावातून मनोज माळी यांच्या पार्थिवाचे जागोजागी औक्षण आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम, मनोज माळी अमर रहे या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.सुट्टीवर आलेले सैनिकही मनोज माळी यांना अभिवादन देण्यासाठी याठिकाणी आले होते.जिल्हाधिकारी एनसीसी तुकडी,आजी-माजी सैनिक, प्रशासकीय अधिकारी, आमदार आणि विविध लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा अंतिमसंस्कार झाला.यावेळी फैरी हवेत झाडून मनोज माळी यांना मानवंदना देण्यात आली.जवान यावेळी अंत्यविधीसाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
