बातमी कट्टा:- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे शिरपूर शहर व तालुक्यात मन की बात एपिसोडच्या श्रवणासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. मन की बात या कार्यक्रमाच्या 101 व्या एपिसोडचे प्रसारण भारतातच नव्हे तर जगभरातल्या प्रसार माध्यमांनी प्रसारित केले. शिरपूर शहरातील बबनराव चौधरी यांचे संपर्क कार्यालयमध्ये दि. 28 मे रोजी “मन की बात” कार्यक्रम पाहण्यासाठी एकत्र आले होते.
यावेळी मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक तथा भारतीय जनता पार्टी मा. प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिकपणे पाहण्यात आला. याप्रसंगी धुळे भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, नरेश पवार, चिटणीस राधेश्याम भोई, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, जिल्हाध्यक्ष पिंटु बंजारा, मन की बात कार्यक्रम तालुका सहसंयोजक अजिंक्य शिरसाठ, भाजयुमो तालुकाध्यक्ष आकाश मराठे, शहराध्यक्ष विक्की चौधरी, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, बाराबलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज बोरसे, नितिन गिरासे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील, राजुलाल मारवाडी, जगत राजपुत, शिंगावे उपसरपंच चंद्रकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिनेश चौधरी, जगन्नाथ पाटील, अभय गौड, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मन की बात कार्यक्रम उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक तथा भाजपा मा. प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले की “मन की बात कार्यक्रम हा सामान्य माणसाच्या सामाजिक जाणिवेतून जनतेशी संवाद साधण्याच्या मंच आहे असे सांगितले. मन की बात कार्यक्रमासाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.