मर्चंट बँकेच्या 43 कोटींच्या दाव्यांना मंजुरी,काय म्हणालेत बॅंकेचे प्रशासक ?

व्हिडिओ साठी लिंक क्लिक करा https://youtu.be/1up1FhHDfrY?si=K6GpsBfMn3YDJiuz

बातमी कट्टा:- शिरपूर येथील दि शिरपूर मर्चंट को.ऑप बँकेतील ठेवींसाठी दावे सादर केल्यानंतर ठेवी विमा व पत हमी प्राधिकरणाने 43 कोटी 35 लाख रुपयांचा विमा मंजूर केला आहे. विम्याची रक्कम प्रशासकांच्या खात्यावर जमा झाली असून आरटीजीएस व एनइएफटी प्रणालीने ऑनलाईन ठेवीदारांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पाठवली जाणार आहे अशी माहिती प्रशासक तथा नाशिक येथील विभागीय उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.

व्हिडिओ साठी लिंक क्लिक करा https://youtu.be/1up1FhHDfrY?si=K6GpsBfMn3YDJiuz


शिरपूर येथील मर्चंट बँकेत बुधवारी (ता.10) प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, व्यवस्थापक संजय कुलकर्णी, उपव्यवस्थापक महेंद्र पाटील उपस्थित होते.


मर्चंट बँकेवर 26 एप्रिलपासून प्रशासक नियुक्त आहे. बँकेला ठेवीदारांच्या 74 कोटी 80 रुपयांच्या ठेवी देणे आहेत. त्यापैकी 68 कोटी 15 लाख रुपयांच्या ठेवी पाच लाख रुपयांच्या आत आहेत. या रकमेपैकी चार हजार 783 ठेवीदारांचे 60 कोटी 93 लाख 32 हजार रुपयांचे विमा दावे प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले. पहिल्या टप्प्यात त्यापैकी 43 कोटी 35 लाख 51 हजार रुपयांचे दावे मंजूर झाले आहेत. उर्वरित दाव्यांमध्ये किरकोळ तांत्रिक त्रुटी आहेत.

व्हिडिओसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/1up1FhHDfrY?si=K6GpsBfMn3YDJiuz

व्हिडिओसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/1up1FhHDfrY?si=K6GpsBfMn3YDJiuz

त्यांचीही पूर्तता केली जात असून लवकरच त्यांनाही मंजुरी मिळणार आहे. प्राप्त रकमेपैकी 46 ठेवीदारांच्या खात्यावर 69 लाख 83 हजार 576 रुपयांच्या रकमा जमा केल्या आहेत. खात्यावर रकमा जमा होणार असल्यामुळे बँकेत कोणीही येऊ नये, टप्प्याटप्प्याने दावेधारकांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. रक्कम प्राप्त झाल्यानंतर ठेवीदारांनी आपली ठेव पावती बँकेत सादर करावी असे आवाहन श्री बिडवई यांनी केले.


प्रशासक नियुक्त असलेल्या राज्यातील चार सहकारी बँकांपैकी केवळ मर्चंट बँकेच्या ठेवीदारांचे दावे प्राधिकरणाने मंजूर केले आहेत. या कार्यवाहीसाठी बँकेला 90 दिवसांचा कालावधी दिला होता. त्यात बँकेने विक्रमी संख्येने अर्ज भरुन घेतले. रिझर्व्ह बँकेच्या दोन प्रतिनिधींनी शिरपूरला येऊन अर्जांची छाननी केली. त्यानंतर अर्ज प्राधिकरणाकडे पाठवले. उर्वरित आठ कोटींच्या रकमेत अनेक किरकोळ स्वरुपाच्या ठेवींचा समावेश आहे. तसेच अनेक ठेवीदारांचे केवायसी अपडेट नाही. त्यामुळे त्यांनी अर्ज भरले नसल्याची माहिती बँकेतर्फे देण्यात आली.

WhatsApp
Follow by Email
error: