बातमी कट्टा:- जवाहर मेडिकल फाउंडेशन मागील ३० वर्षांपासून धुळे जिल्हयात आरोग्य सेवा देत आहे. फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिनांक २ ऑक्टोबरपासून गोरगरीब रूग्णांसाठी सेवा सप्ताह कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पअंतर्गत १५ ऑक्टोबरपर्यंत ओपीडी सेवा मोफत देण्यात येत आहे.
ओपीडी दरम्यान रूग्णांना ठराविक तपासण्या मोफत तर काही तपासण्या अल्प दरात देण्यात येत आहेत. तर आयपीडी अर्थात ॲडमिट रूग्णांसाठी रक्त तपासण्या, शस्त्रक्रिया, बेड-नर्सिंग चार्जेस, एक्स रे तसेच मर्यादित औषधी आदी सेवा मोफत देण्यात येत आहेत. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त गोरगरीब रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी देशाप्रती आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. आपणही देशाप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतून जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, डॉ.ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ.मधुकर पवार या व्यवस्थापनाने हा समाजोपयोगी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तब्बल १५ ऑक्टोबरपर्यंत सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. या सेवा सप्ताहात ओपीडी सेवेत काही तपासण्या मोफत तर महागडया चाचण्यांसाठी मोठी सवलत देण्यात येईल. तर ॲडमिट रूग्णांना डॉक्टरांची तपासणी, किरकोळ तसेच मोठया शस्त्रक्रियांचा डॉक्टरांचा खर्च, बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, काही प्रमाणात औषधे मोफत देण्यात येणार आहेत. तरी १५ ऑक्टोबरपर्यंत जास्तीत जास्त रूग्णांनी या मोफत सेवांचा लाभ घ्यावा असे अवाहन व्यवस्थापनाने केले आहे.