महामार्गावर ट्रकचा “अपघात”

बातमी कट्टा:- भरधाव ट्रकने समोर चालणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी घडली आहे. यात ट्रकचा पुढील भाग चकाचुर झाला असून सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार सुरत नागपूर महामार्गावर धुळे तालुक्यातील नवे भदाणे फाट्यावर नेर फाटा व भदाणे फाटा येथे दोन्ही बाजूला गतीरोधक बसविण्यात आले आहेत.सुरत कडून कर्नाटक कडे जाणारा कंटेनर गतीरोधक वर हळू झाल्यानंतर केऐ 56 2572 क्रमांकांच्या भरधाव येणाऱ्या ट्रकने त्या कंटेरला जोरदार धडक दिली.या अपघातात ट्रकचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.या ट्रक मधील चालक व क्लिनर ला किरकोळ इजा झाली असून या अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.घटनास्थळी नेर पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल होऊन रस्ता सुरळीत करत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: