
बातमी कट्टा:- महाराणा प्रतापसिंहजी यांचा अश्वरुढ पुतळ्याचे उद्या दि १५ ऑगस्ट रोजी शिरपूर तालुक्यातील सावळदे गावात आगमन होणार आहे.दहीवद येथून संपूर्ण शहरातून बाईक रॅलीसोबत सावळदे येथे महाराणा प्रतापसिंहजी यांचा अश्वरुढ पुतळ्याचे आगमन होणार आहे.
जयपूर येथील महाराणा प्रताप स्मारक यांच्या मार्फत शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वरुढ पुतळा देण्यात आला आहे.जयपुर येथून अश्वारूढ पुतळा दहीवद येथे दाखल होणार असून दहीवद येथून उद्या दि १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता दहिवद गावातून बाईक रॅलीला सुरुवात होणार असून कळमसरे गावासह शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.
सावळदे येथील महाराणा प्रतापसिंह प्रतिष्ठान च्या वतीने महाराणा प्रतापसिंह अश्वारूढ पुतळा विराजमान करण्यात येणार आहे. या भव्यदिव्य बाईक रॅलीसाठी शिरपूर शहरासह तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.यासाठी सावळदे महाराणा प्रतापसिंह प्रतिष्ठान व शिरपूर शहर व तालुका राजपूत समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.