महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी दि 10 डिसेंबर रोजी मतदान….

बातमी कट्टा:महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची मुदत 1 जानेवारी, 2022 रोजी पुर्ण होत असल्याने या रिक्त होणा-या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून आजपासून आचार संहिता लागू झाली आहे.

या मतदार संघासाठी शुक्रवार, दिनांक 10 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. मंगळवार, 14 डिसेंबर, 2021 रोजी मतमोजणी होणार असून गुरुवार, 16 डिसेंबर, 2021 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: