बातमी कट्टा:- चारीत्र्याच्या संशयावरून मारहाण करत गळा आवळून महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना काल दि १५ रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून महिलेसोबत राहणाऱ्या संशयिताने खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.शेजारींना महिला घरात मृत अवस्थेत पडल्याचे दिसल्याने घटना उघडकीस आली आहे.
या बाबत धुळे शहर पोलीस स्टेशन दिलेल्या फिर्यादीत म्हटले की नीता वसंत गांगुर्डे रा.गोपाळनगर मागे जमनागिरी,धुळे या विनोद ऊर्फ बादल नाहार रा.गोपाळनगर भिलटी जमनागिरी धुळे याच्यासोबत लग्न करण्यासाठी मार्च २०२० पासून घरातून निघून गेली होती.गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नीता गांगुर्डे या संशयित बादल नाहार सोबत राहत होती.बादलने दि १४ रोजी रात्री दहा ते दि १५ रोजी दहावाजे दरम्यान नीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन बेदम मारहाण करुन तीचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत बादल नाहार विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले होते.पोलीसांकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली.तर मृतदेह शवविच्छेदनासाठी हिरे महाविद्यालयात दाखल करण्यात आला.