महिलेचा विनयभंग,आप्पा गिरासेवर गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडीओ देखील झाला होता व्हायरल…

बातमी कट्टा:- नातलग असलेल्या महिलेस आग्रह करून मोटरसायकलवर बसवून नेऊन रस्त्यात तिचा विनयभंग केल्याच्या संशयावरून दोंडाईचा येथील खते बि बियाणे विक्रेते आप्पा रतनसिंह गिरासे याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर याआधी आप्पा गिरासे यांनी देखील मारहाण झाल्याची फिर्याद पोलीस स्टेशनात दिली होती.मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दोंडाईचा येथील खते बि-बियाणे विक्रेते आप्पा रतसिंग गिरासे यांनी दोंडाईचा पोलीस स्टेशनात फिर्याद दाखल केली होती.फिर्यादीत म्हटले होते की ते गोडाऊन मध्ये असतांना महिलेचे नाव का घेतले म्हणत सहा जणांनी आप्पा गिरासे यांना मारहाण करण्यात आल्याचे त्यांंनी फिर्यादीत म्हटले आहे.या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता.याप्रकरणी आता पिडीत महिलेने आप्पा रतनसिंग गिरासे रा दोंडाईचा याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनात फिर्याद दाखल केली आहे.

पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की ही घटना एक जुलैला घडली होती.पीडित महिला मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. तिची मुलगी आजारी असल्यामुळे तिला उपचारासाठी दोंडाईचा येथे बहिणीच्या घरी नेले होते. उपचार करून सदर महिला बहीण व मुलीसोबत घरी जात असतांना संशयित नातेवाईक आप्पा गिरासे याने त्यांना थांबवले. तुम्हाला घरी सोडतो असे सांगितल्यानंतर आम्ही तीन जणी आहोत, पायी घरी जाऊ असे महिलांनी उत्तर दिले. मात्र त्याने एकेकीला घरी सोडतो असे सांगून खूपच आग्रह केला. तो नातलग असल्याने विश्वास ठेवून पीडित महिला त्याच्यासोबत मोटारसायकलवर गेली. रस्त्यात दादा नगर जवळ त्याने मोटारसायकल थांबवली. पैशांची मदत करण्याचे प्रलोभन दाखवले. महिलेने नकार दिल्यानंतर अश्लील बोलून तिचा विनयभंग केला.तिने घरी येऊन हा प्रकार सांगितला. कुटुंबाशी विचारविनिमय करून तिने फिर्याद दिली. त्यावरून संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

WhatsApp
Follow by Email
error: