
बातमी कट्टा:- राजस्थान राज्यातील जयपूर येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेसिंह गोगामेडी यांच्या गोळ्या झाडून हत्याची घटना घडली.या घटनेनंतर सर्वत्र सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या श्रध्दांजली देत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत असून नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावात देखील राजपूत समाजाच्या वतीने श्रध्दांजली वाहत हल्लाप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रीय राजपूत करणीसेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांच्यावर दि 5 रोजी गोळ्या घालून हत्याची घटना घडली होती.या घटनेनंतर राजस्थान राज्यात सर्वत्र निषेध व्यक्त होत असतांना महाराष्ट्रात देखील राजपूत समाजाच्या वतीने निषेध नोंदवत सुखदेवसिंह गोगामेडी यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.शहरासह ग्रामीण भागात देखील आता सुखदेवसिंह गोगामेडी यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावात राजपूत समाज व महाराणा प्रतापसिंह नवयुवक मित्रमंडळच्या वतीने मेणबत्ती पेटवून सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या घटनेचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र प्रतापसिंहजी चौक येथे सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.