
बातमी कट्टा:- मामे बहिणीच्या लग्नसमारंभात मांडवातील तोरणसाठी आंब्यांची पाने घेण्यासाठी स्कुटीवर गेलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला तर सोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि १० रोजी शनिवारी घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार कपिल शामसुंदर कासार मुळ मध्यप्रदेशातील ठिकरी येथील असून ते धुळे तालुक्यातील सोनगीर येथे गेल्या विस वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत राहत होते तर ते तांबे पितळाच्या भांड्यांचे कारगिर होते.दि १२ रोजी कपिल कासार यांचे सोनगीर येथील मामा गोपाल चम्पालाल कासार यांच्या मुलीचे दि १२ रोजी विवाहसोहळा आहे. यासाठी मांडवातील तोरणसाठी आंबांच्या पाने घेण्यासाठी कपिल कासार आणि सोहन गोपाल कासार दोन्ही जण स्कुटीने सोनगीरच्या पुढे जामफल धरण परिसरात जात असतांना स्कुटी स्लिप झाल्याने अपघात झाला.अपघातानंतर कपिल कासार व गोपाल कासार यांना रुग्णालयात दाखल केले असता कपिल कासार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर गंभीर जखमी झाल्याने गोपाल कासाळ यांना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.कपिल कासार यांच्या पश्चात आई,वडील मुलगा (२ वर्ष) मुलगी (६ वर्ष) आणि पत्नी असा परिवार होत.या घटनेमुळे सर्त्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.