
बातमी कट्टा:- शिरपूरचे नामांकित सर्जन डॉ. विजेंद्र लक्ष्मण पाटील (एम.एस, शल्यचिकित्सक) व डॉ. सौ. नेहा विजेंद्र पाटील (एम.एस. स्कॉलर) (स्त्री रोग व प्रसुती तज्ञ) यांचे माऊली हॉस्पिटल हे स्थलांतरित होत असून शहरातील महेश नगर येथील डॉ. तुकाराम दिघोरे यांच्या हॉस्पिटल शेजारी माऊली हॉस्पिटलची प्रशस्त आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपचार साहित्याने युक्त इमारत साकारण्यात आली असून माऊली हॉस्पिटलचा दि 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भव्य शुभारंभ होणार आहे.

माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्याहस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला आमदार काशीराम पावरा अध्यक्षस्थानी असतील.माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, प्रियदर्शनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश सदस्य प्रभाकर चव्हाण, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी विद्याविहार सोसायटीचे अध्यक्ष अशोक कलाल बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, पीपल्स बँकेचे अध्यक्ष योगेश भंडारी माजी संचालक कमलकिशोर भंडारी, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक आशीष पाटील यांच्यासह विविध भागातील लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स क्लबचे पदाधिकारी, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
माऊली हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा
सुसज्ज वातानुकुलीत ऑपरेशन थिएटर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सुविधा,मुतखडा निदान व उपचार पोटाचे विकार निदान व उपचार,गुद्गत व्याधी मुळव्याध, भगंदर, फिशर यावर विशेष चिकीत्सा व शस्त्रक्रिया मुळव्याध व भगंदर यावर क्षारयुक्त चिकीत्सा कॅन्सर निदान व उपचार Band Ligation, Sclerotherapy, Stapler Haemorrhoidectory शस्त्रक्रिया, गर्भपिश्वीचे विकार निदान व शस्त्रक्रिया, अपघात रुग्णांवर उपचार, जळीत कक्ष ,ऑक्सिजन सुविधा । पल्स ऑक्सीमिटर। नेब्युलायझेशन हार्निया, हायड्रोसिल, अॅपेंडिक्स, स्तनाचे आजार, लहान मुलांवरील शस्त्रक्रिया दुर्बिणीव्दारे अॅपेंडिक्स, गर्भपिशवी, पित्ताशय, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटातील अजारांचे निदान व उपचार,सुसज्य प्रसुतिगृह
डॉ विजेंद्र पाटील आणि डॉ नेहा विजेंद्र पाटील यांचे प्रेरणास्थान माजी आमदार शंभाजीराव पाटील,अधिकार अंकुश पाटील,लक्ष्मण अंकुश पाटील, मोतीराम अंकुश पाटील, भरत रामदास पाटील व विशेष मार्गदर्शक डॉ. राजेश वसावे (जनरल सर्जन वर्ग १ जि.रूग्णालय नंदुरबार) व डॉ शिरीषकुमार शिंदे(जनरल सर्जन ,डायरेक्टर निम्स मेडिकल हॉस्पिटल नंदुरबार) यांचे लाभले आहे.