माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जावईला ईडीकडून अटक

बातमी कट्टा:- जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव यांचे जावई गिरीष चौधरी यांना ईडीने चौकशी नंतर अटक केल्याने खळबळ उडाली आहे.रात्रभर चौकशी सुरु होती अशी माहिती प्राप्त झाली आहे.

भोसरी भुखंड प्रकरणी ईडीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा जावई गिरीष चौधरी यांची रात्रभर चौकशी नंतर ईडीने अटक केले आहे.याच भोसरी भुखंड प्रकरणाच्या आरोपामुळे महसूलमंत्री असतांना एकनाथराव खडसे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

एकनाथराव खडसे हे महसूल मंत्री असतांना भोसरी औद्योगिक वसाहतीमधील एका भूखंडाच्या खरेदीवरुन एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप करण्यात आले होते.एकनाथराव खडसे यांची देखील ईडीने चौकशी केली होती आता त्यांच्या जावई गिरीष चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: