
बातमी कट्टा:- घरातून बेपत्ता असलेल्या माजी सरपंच यांचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास मासेमारी करणाऱ्यांना तापीत मृतदेह मिळुन आला असून याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शहादा तालुक्यातील कोठली त सा येथील माजी सरपंच देवेंद्र संतोष खैरनार वय 47 यांनी रविवार पासून घरातून बेपत्ता होते.त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. याबाबत सारंगखेडा पोलीस स्टेशनला बेपत्ता असल्याची खबर पोलीस ठाण्यात दिली होती.सोमवारपासून कुटुंबीयांकडून व पोलिसांकडून त्यांचा सारंगखेडा तापी नदीपात्रात शोध घेण्यात येत होता अखेर त्यांचे शव मंगळवारी सकाळी नांदरखेडा व पळासवाडा येथील मासेमारी करणाऱ्यांना दोन्ही गावांच्या मध्यभागी तापी नदीपात्रात मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना आढळून आले नांदरखेडा व पळासवाडा पोलीस पाटील यांनी सारंगखेडा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली घटनास्थळी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस कर्मचारी पो.हे. कॉ प्रकाश चौधरी , पो.कॉ.ठाणसिंग राजपूत दाखल झाले व त्यांनी ग्रामस्थांच्या व मासेमारी करणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले होते.