
बातमी कट्टा:- धुळे शहरातील टिपू सुलतान स्मारक प्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी दिलेल्या सुपारीमुळेच सहा महिन्याच्या पुर्वी गुन्ह्यांत अतिरिक्त कलम दाखल करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप धुळे शहराचे एमआयएमचे आमदार डॉ.फारुक शहा यांनी केले आहेत.

आमदार फारूक शहा म्हणालेत की,आपल्या जीविताला धोका असून, आपल्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास याला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील जबाबदार राहतील असे विधान यांनी केले आहे. सहा महिन्यापूर्वीच्या गुन्ह्यात वाढीव कलम लावल असून यासाठी समोर जाणार असल्याचे आमदार फारूक शहा यांनी सांगितले आहे.
नाशिक ड्रग प्रकरणातील ललित पाटील याचा आणि बि जी शेखर पाटील यांचा संपर्क असल्याचा खळबळजनक आरोप अद्यापही आमदार शहा यांनी कायम ठेवला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांबाबत लेखी तक्रार देखील ते गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार फारूक शहा यांनी सांगितले.