माझ्या भाऊबंदकीचा विकासाच्या बाजूनेच कौल – आ.जयकुमार रावल

बातमी कट्टा:- शिंदखेडा मतदारसंघात माझी भाऊबंदकी ही तब्बल साडेतीन लाख मतांची आहे, आणि माझी भाऊबंदकी ही सदैव विकासाच्या पाठिशी असते, मी रात्रदिवस मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव काम करीत असतो, शिक्षण सिंचन उदयोग या त्रिसुत्री सोबतच मतदारसंघात मुलभूत पायाभुत सुविधा उपलब्ध केल्या आहेत, भविष्यात माझा मतदारसंघ हा राज्यातील अग्रगण्य मतदारसंघातील एक असावा यासाठी माझा प्रवास सुरू असून त्यात येत्या 5 वर्षात मला यश मिळेल असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी दिली आहे.

आ.रावल म्हणाले की, मी राजकारण करतांना सतत सर्व समाजांना सोबत घेवून राजकारण करत असतो, त्यामुळे माझ्या विरोधकांकडे मतदारसंघातील कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था नाही, सर्वच सत्ताकेंद्रे ही भाजपाच्या ताब्यात आहेत, यापुढे देखील विकासाचा झंझावात सुरू राहणार असून यावेळी माझ्या भाऊबंदकीने मागील सर्व रेकॉर्ड ब्रेक करून जवळपास लाखाच्या मताधिक्याने मला निवडून दिले त्याबददल मतदारसंघातील तमाम मतदार बंधू आणि विशेषत: माझ्या लाडक्या बहिणींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया आ.जयकुमार रावल यांनी दिली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: