
बातमी कट्टा:- तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मामी भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दि 13 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.यात गरोदर माता असलेल्या मामीचा भाचीला वाचवतांना मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील नंदाणे गावालगत असलेल्या पांझर तलावात सुंदरबाई समाधान होलार वय 21 ह्या त्यांच्या भाची शिवानी आंबा होलार वय 7 हिच्या सोबत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या यावेळी सुंदराबाई होलार या कपडे धुत असतांना जवळ उभ्या असलेली भाची शिवानी हिचा पाय घसल्याने शिवानी पाण्यात पडली.यावेळी तीला वाचविण्यासाठी गेलेल्या मामीचा देखील पाण्यात बुडू लागल्या यावेळी शेतात असलेल्या एकाला दोन जण पाण्यात बुडत असल्याचे दिसतात मदत कार्य करत मामी सुंदराबाई व भाची शिवानी दोघांना पाण्यातून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांना मृत घोषित केले.सुंदाराबाई गरोधर माता असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.