
बातमी कट्टा:- मायलेकाने तापी नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.आपल्या मुलासोबत सासरी जात असतांना गिधाडे तापी नदीपात्रात उडी घेतल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बॅग साडी,वह्या मिळुन आले आहेत.नदीपात्रात शोधकार्य सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 16 रोजी दुपारी तापी नदीपात्रात महिलेने आपल्या दहा वर्षाच्या मुलासोबत उडी घेतली आहे. घटनास्थळी एक बॅग मिळुन आली बॅगमध्ये तेजेंद्र रविंद्रसिंग राजपूत नाव व मोबाईल नंबर लिहेलेली वही मिळुन आली तर साडी देखील मिळुन आली आहे.तापीत उडी घेतांना एकाने बघितल्यानंतर घटनेची माहिती सर्वत्र समजली तर वहीवर लिहीलेल्या नावावरुन ओळख उघड झाली आहे.

शिरपूर तालुक्यातील वाडी येथील योगीताबाई रविंद्रसिंग गिरासे वय 30 या आपल्या दहा वर्षाच्या तेजेंद्र रविंद्रसिंग राजपूत मुलासोबत शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे माहेरी गेले होते.आज दि 16 रोजी योगीताबाई राजपूत व त्यांचा मुलगा तेजेंद्र रविंद्रसिंग राजपूत मुलासोबत सासर वाडी बु. ता.शिरपूर येथे येण्यासाठी निघाले होते.दुपारी दोन्ही माय लेकांनी तापी नदीपात्रात उडी घेतली.
घटनास्थळी योगीताबाई यांच्या नातेवाईकांसह वाडी ता.शिरपूर येथील नातेवाईक गिधाडे तापीनदी पुलावर दाखल झाले असून दोघांचा तापीनदीपात्रात शोध सुरु आहे. योगीताबाई या आपल्या कुटूंबासोबत सुरत येथे राहत होते. आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
