बातमी कट्टा:- आईसह मुलीचा विहीरीत मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना काल दि 4 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.आई आणि मुलीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक आंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अमळनेर तालुक्यातील नीम येथील जयश्री समाधान कोळी वय 30 व मुलगी नंदिनी समाधान कोळी वय 8 यांचा असळनेर तालुक्यातील कळमसरे शिवारातील विहीरीत मृतदेह तरंगतांंना आढळून आला आहे.
कळमसरे शिवारातील वीज उपकेंद्रासमोरील नीम रस्त्याला सबस्टेशन जवळील विहीरीत माय लेकींचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.घटनेची माहिती मारवड पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्यात आला.त्या दोघांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.