बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा महामार्गावरील फाटयावर मध्यप्रदेश परिवहनच्या वाहन चालक व वाहक सोबत झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या बस वाहक योगेंद्रसिंग सिसोदिया (५०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली आहे.
मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाटयावर दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश परिवहनची धुळे बड़वानी बस येऊन थांबली. बसमधील प्रवासी बसविण्याच्या विषयावरुन बस वाहक योगेंद्रसिंग सिसोदिया (५०) रा. राजघाट रोड, बडवानी याच्याशी त्याठिकाणी उभ्या असलेल्या अज्ञात खाजगी वाहन चालकासोबत वाद झाला. यावेळी मारहाणीत बस वाहक जखमी झाले आहे. त्यानंतर बस ही सेंधवाकडे जाण्यासाठी निघाली.बस पळासनेर जवळ पोहचली असता वाहक सिसोदिया यांचे डोके दुखू लागले, त्यामुळे त्यांना सेंधवा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात खाजगी वाहन चालकाविरोधात पोलिसात तक्रार असल्याची माहिती बससोबत असलेला कर्मचारी विक्रमसिंग चव्हाण यांनी दिली.