बातमी कट्टा:- शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामासाठी पैसे घेऊन परत न करता उलट पत्रकाराची व पोलीसांची धमकी देत मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची घटना सावित्रीबाई फुले नगर वरवाडे येथे घडली आहे. याबाबत चौघांविरुद्ध अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत देविदास करंकाळ रा.सावीत्रीबाई फुलेनगर, वरवाडे,शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारी नुसारसंशयित हरीलाल कन्हैयालाल जुलवाणी,गोपाल कन्हैयालाल जुलवाणी, कुणाल हरीलाल जुलवाणी, पियुष हरीलाल जुलवाणी सर्व राहणार खालचे गाव,बालाजी मंदिर, शिरपूर यांनी भरत करंकाळ याच्या मित्राकडून शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामासाठी उधारीने पैसे घेतले होते. मित्राने संशयितांकडे भरत करंकाळ यांच्या सांगण्यावरून पैशाचा तगादा लावल्याच्या संशयावरून चौघां संशयितांनी भरत करंकाळ यास फुले नगर येथे गाठून मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ करत मी पत्रकार असून सर्व पोलीस माझ्या सोबत असून माझ काहीच होणार नाही अशी चेतावणी दिल्याची तक्रार भरत करंकाळ यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात दिल्याने कन्हैयालाल जुलवाणी,गोपाल कन्हैयालाल जुलवाणी, कुणाल हरीलाल जुलवाणी, पियुष हरीलाल जुलवाणी या चारही संशयितांवर विविध कलमांसह अॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पूढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे करीत आहेत.