बातमी कट्टा:- धुळे शहरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील दोन संशयितांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेत 3 चोरीच्या मोटारसायकल हस्तगत केले आहे.तर तीसरा संशयित फरार झाला आहे.

धुळे शहर पोलीस स्टेशनात दि 7 रोजी फिर्याद दाखल होती. त्या फिर्यादीत अरिहंत ज्वेलर्स समोरुन युनिकॉन मोटरसायकल चोरी झाल्याचे म्हटले होते.याबाबत धुळे शहर पोलिसांनी शोध मोहीम सुरु करत सि.सी.टीव्ही फुटेजची तपासणी केली त्या सि.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे मालेगांव येथील संशयितांनी मोटरसायकल चोरी केल्याचे त्यात आढळले होते.
धुळे शहर पोलिसांनी मालेगावातील जाफरनगर येथील शोएब उर्फ पापे अहेमद वय 25 व अब्दुल सालीक मोमीन वय 43 या दोघांना ताब्यात घेतले तर संशयितांपैकी तीसरा संशयित अमजदअली अन्सारी रा मालेगाव हा फरार झाला. पोलिसांनी चोरट्यांकडून 65 हजार किंमतीचे युनिकॉन,हिरो होंडा स्पलेंडर प्लस अशा 3 मोटरसायकल हस्तगत केले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, दादासाहेब पाटील,निरी,एन.एस आखाडे,भिकाजी पाटील, संदीप पाटील,प्रल्हाद वाघ,प्रसाद वाघ,प्रविण पाटील,मनिष सोनगिरे,अविनाश कराड,शेखर वाडेकर,शाकीर शेख,नितीन अहीरे,अचिन पगारे आदींनी केली आहे