बातमी कट्टा:- मोटरसायकली चोरी करुन कमी किंमतीत विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 80 हजार किंमतीच्या आठ चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.की काही संशयित मोटरसायकली चोरी करुन होळनांथे परिसरात कमी किंमतीत विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे दि 12 रोजी गोपाल भाईदास शिरसाठ रा.पिळोदे ता.शिरपूर याला शिताफीने ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता.त्याने त्याचे मित्र राकेश संजय कोळी रा.टेकवाडे ता.शिरपूर गणेश सिताराम पवार रा.आमोदे ता.शिरपूर व राजा कपुरदास बैरागी रा.आमोदे ता.शिरपूर यांच्या मदतीने मोटरसायकली चोरी केल्याची कबूली दिली.त्यांच्या कडून 3 होंडा शाईन,2 ड्रिम युगा,1 सी.डी.डिलक्स,1 टी.व्ही.एस स्टार सिटी व 1 युनिकॉरन अशा एकुण 2 लाख 40 हजार किंमतीच्या 8 मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सा.पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोउनि.योगेश राऊत,असई सुनिल विंचूरकर, संतोष हिरे,मनोज पाटील, चेतन कंखरे,किशोर पाटील, कैलास महाजन आदींनी कारवाई केली आहे.