मित्रानेच केला मित्राचा खून, संशयिताला जन्मठेपेची शिक्षा…

बातमी कट्टा:- गावातील एका कुडाला आग लागली होती.आग लागल्याच्या संशयावरुन संशयिताला ग्रामस्थांनी मारहाण केली.यात मित्राने देखील मारहाण केल्याने संशयिताने दि 9  जून 2019 रोजी मित्रावर तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली होती.पोलीसांनी संशयिताला ताब्यात घेतले होते.याप्रकरणी सोमवारी मा.न्यायालयाने संशयिताला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील देवझिरी येथील दिपक बजर्या पावरा व पिंटू किरता बारेला हे दोघे मित्र होते. गावातील एका कुडाला आग लावल्याच्या संशयावरुन पिंटू बारेला यास ग्रामस्थांनी मारहाण केली होती.यावेळी दिपक पावरा याने देखील मारहाण कली होती.आपणास मारहाण केल्याचा राग पिंटू बारेला याच्या मनात होता. दि 9 जून 2019 रोजी सकाळी 7:30 वाजता दिपक पावरा याला दुकानाकडे बोलावून पिंटु बारेला याने तीक्ष्ण हत्याराने वार केले.यात दिपक पावरा गंभीर जखमी झाला त्याचा रुग्णालयात घेऊन जातांना मृत्यू झाला होता.

याप्रकरणी पिंटु बारेला याच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.दि 13 जून रोजी पिंटू बारेला या संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले होते.अखेर सोमवारी अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी गायधनी यांनी संशयित आरोपी पिंटू बारेला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: