मित्राला फोन केला,तापीत उडी घेतली,अन् तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळला…

बातमी कट्टा:- घरातून बेपत्ता झाल्यानंतर मित्राला फोन करुन मोबाईल चार्जर चप्पल तापी पुलावर सोडून तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या करत असल्याची तरुणाने माहिती दिली.त्याचा शोध सुरू केला असता तापी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळल्याची घटना आज दि २९ रोजी दुपारी घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील महेश श्रावण धनगर वय २० हा दि २५ रोजी रात्री घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेला.व त्याने त्याचा मित्र अविनाश याला फोन करुन सांगितले की माझा मोबाईल,चार्जर आणि चप्पल सावळदे तापी पुलावर असून ताफी नदीत उडी घेऊन आत्महत्या करत असल्याचे सांगितले.घटनेची माहिती घरातील सदस्य व गावकऱ्यांना मिळाल्यानंतर त्याची शोधा शोध सुरु झाली.त्याने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कळाल्याने तापी नदीपात्रात त्याचा शोध सुरु असतांना सावळदे गावाजवळ आज दि २९-रोजी निम्स कॉलेजच्या दिशेला पाण्यात त्याचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले.

घटनास्थळी गावातील पोलिस पाटील वसंत धनगर,किरण धनगर यांच्यासह गावकऱ्यांनी धाव घेऊन महेश याचा तापी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.भगवतं मधुकर धनगर यांनी याबाबत शिरपूर शहर पोलिस स्टेशनात खबर दिली आहे.

महेश धनगर हा घरातील एकुलता एक होता.तो आर सी पटेल वाचणालयात कामाला होता.त्याच्या आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. महेशच्या पश्चात बहिण आई आणि वडील असा परिवार होत.

WhatsApp
Follow by Email
error: