बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात सोमवारी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य पदासाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणूक निकालानंतर काही उत्साही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निवडणूक विषयक मनाई आदेश असतांना करवंद नाका परिसरात डिजे लावून मिरवणूक काढून आदेशाचे उल्लंगन केल्याप्रकरणी दोन डिजेंवर पोलीसांनी कारवाई करत डिजे जप्त केले.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दोन डिजे वाहने जप्त करून गुन्हा दाखल केल्याची कारवाई केली आहे.या कारवाईत रामा ऑडीओ नावाचे डिजेचे एमएच ०४ सीपी १०३९ व वैष्णवी डीजे एमएच ०४ इबी २०५९ क्रमांकाची वाहने जप्त करून डिजे मालक व चालक दिनेश सुरेश वाडीले रा.कुंभारटेक आणि सुरेश सजन पावरा रा.वाघाडी ता शिरपूर यांच्या विरुद्ध मनाई आदेशाचे उल्लंगन व मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये वेगवेगळे दोन गुन्हा दाखल केल आहेत.सदर कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख पोहकॉ, हेमंत पाटील,जावेद शेख,लादूराम चौधरी, कैलास वाघ,पोकॉ मनोज दाभाडे यांनी केली आहे.