बातमी कट्टा:- महाराष्ट्र राज्यात विक्रीकरता प्रतिबंधित असलेल्या अवैध बियर साठ्याची वाहतूक सुरु असतांना मुंबई येथील भरारी पथकाने पहाटेच्या सुमारास कारवाई करत अवैध बियरसह सुमारे 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शहादा तालुक्यातील जावद तर्फे बोरद शिवारातील वाडी गावाच्या हद्दीतील पुनर्वसन जवळील कोरड्या पोसली नदीच्या पात्राच्या ठिकाणाहून काल दि 29 रोजी पहाटेच्या सुमारास एम.एच 18 एए 0204 क्रमांकाची आयशर महाराष्ट्र राज्यात विक्रीकरता प्रतिबंधित असलेल्या अवैध बियर साठ्याची विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक केली जाणार होती तो साठा दुसऱ्या जि.जे 34 टी 1317 क्रमांकाचे डंपर व एम.एच 04 एचडी 5710 क्रमांकाची महिंद्रा बोलेरो या दोन वाहनातून बियरचे 450 बॉक्स व एक मोबाईल असा 35 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मुंबईच्या भरारी पथकाने कारवाई करत ताब्यात घेतला.याप्रकरणी पथकाने मगन दखण्या वसावे वय 35 रा.जीवनगर कुडावत जावदा ता.शहादा याला ताब्यात घेत इतर संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई कांतीलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार निरीक्षक मनोज चव्हाण तसेच दुय्यम निरिक्षक प्रमोद कांबळे,जवान विशाल बस्ताव,अमोल हिप्परकर,प्रवीण धवणे,अमोल चिलगर, धनाजी दळवी अविनाश जाधव यांनी प्रत्यक्ष कारवाई केली. यात स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मदत केली असून.सदर गुन्ह्याची फिर्याद विशाल बस्ताव यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास मनोज चव्हाण निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुंबई हे करीत आहेत.