
बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा महामार्गावर बिजासन पोलीस चौकीसमोर पुढे चालणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव वेगात असलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली असून या अपघातात मध्यप्रदेशातील चार जण जखमी झाले आहेत.सांगा पावरा,नरसिंग हजारिया पावरा,ज्ञानीबाई गणेश सर्व जुनाझिरी मध्यप्रदेश असे अपघातात जखमीं झालेल्यांची नावे आहेत.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

हे सर्व दुपारी मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील जुनाझिरी येथून दुचाकीने महामार्गरून महाराष्ट्रातील फत्तेपुर येथे असलेल्या घरी जात बिजासन घाटात बिजासन पोलीस चौकी समोर रविवारी दुपारी मागून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली.त्यात चार ही जण जखमी झाले.समोरच अपघात झाल्याने पोलीस चौकीचे प्रभारी सुरेश पाटीदार, हेड कॉन्स्टेबल हरिओम यादव, कॉन्स्टेबल दशरथ गुजर, नगरचे शिपाई नंदू कलाम सिंग आदींनी धाव घेत अम्ब्युलन्सला कळविले मात्र अम्ब्युलन्सला उशीर होणार असल्याने जखमींना तात्काळ चौकीवरील वाहनाने रुग्णालयात हलविण्यात आले.पुन्हा या अपघात निमित्ताने बिजासन घाटात अम्ब्युलन्सची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
