मुंबई-आग्रा महामार्गावर जीएसटी अधिकाऱ्यासह दोघांवर खंडणीचा गुन्हा

बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पानमसाला आणि सुगंधित तंबाखू वाहतुकीच्या आयशर वाहनाला अडवून तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या जीएसटी अधिकारी आणि दोन खाजगी इसमांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. जीएसटी अधिकारी रविकिरण देसले, तसेच सुनील भामरे आणि दिनेश मराठे या दोघांनी मिळून तंबाखू व पानमसाला वाहतूक करणारे आयशर वाहन जबरदस्तीने अडवून “पाच लाख रुपये दिले तर वाहन व माल सोडून देऊ” अशी मागणी केली.दरम्यान, ही हालचाल शिंदखेडा पोलीस स्टेशनचे एपीआय हनुमंत गायकवाड यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ कारवाई करून ही संपूर्ण बाब उघडकीस आणली.या घटनेनंतर नरडाणा पोलिस ठाण्यात जीएसटी अधिकारी देसले आणि दोन्ही खाजगी इसमांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, या प्रकरणात शिंदखेडा व नरडाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पानमसाला व सुगंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्या दोन आयशरांविरोधातही गुन्हा नोंदवला आहे.या कारवाईत एक कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.सदरची कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधिक्षक धुळे, अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक धुळे, सुनिल गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर यांचे मार्गदर्शनाखाली नरडाणा पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश मोरे, शिंदखेडा पो.स्टे.चे सपोनि एच एल गायकवाड, तसेच नरडाणा पो.स्टे.चे पोसई/रविद्र महाले, विजय आहेर, चालक ग्रपोसई अजय सोनवणे, पोहेकॉ/गणेश पाटील, रईश शेख, ललीत पाटील, भरत चव्हाण, नारायण गवळी, योगेश गिते, भुरा पाटील, पोकॉ/अनिल सोनवणे, पोकॉ/ भोई, पोकों/अर्पण मोरे, सचिन बागुल यांनी केलेली आहे

WhatsApp
Follow by Email
error: