बातमी कट्टा:- व्यसनाधीन मुलाला संपवण्यासाठी आईनेच खूनाची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघड झाली आहे.पोलीसांनी आईसह आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.आणखी दोन संशयितांचा शोध सुरु आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे दि १ रोजी अमोल भामरे वय ३८ या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.अमोलचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते.घटनास्थळी पोलीसांकडून चौकशी करण्यात येत होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु असतांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना सदर गुन्हा पुंडलिक गिरधर भामरे,रा मेहरगाव याने त्याच्या साथिदारासह केला असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती.पोलीसांनी पुंडलिक भामरे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता दि ३० रोजी ७ वाजेच्या सुमारास अमोल भामरे याला पार्टी करण्याच्या बहाण्याने फोन करुन मेहेरगाव येथील बस स्टँण्ड जवळ बोलवून इतर दोन साथिरानसह नवलाणे गावाच्या शिवारातील इंग्लिश मेडीयम स्कुलच्या आवारात पार्टीकरीता बोलवून दोरीने गळा आवळून खून केला असल्याची कबुली दिली.
अमोल व्यसनाधीन होता तो काही एक कामधंदा न करता रोजच आई वडीलांशी भांडण करत पैशाची मागणी करत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून मयत अमोलची आई लताबाई हिनेच त्याच्या खूनाची २५ हजार रुपयात सुपारी दिल्याचे संशयित पुंडलिक भामरे यांनी कबुली दिली आहे.
याप्रकरणी पोलीसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे त्यात अमोलची आई लताबाईचा समावेश आहे.याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून आणखी दोन संशयितांचा शोध सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्याच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.